उष्णतेच्या लाटेत 'अशी' घ्या आरोग्याची काळजी...


-डॉ. रणजित ढोले (एम डी होमिओपॅथी)




उष्णतेची लाट केव्हा घोषित कली जाते ?

जेव्हा कमाल तापमान किमान 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक होते.


•उष्णतेची लाटेत सुरक्षित राहण्यासाठी कोणते उपाय करावेत ? 


१) कामे करताना - दुपारी १२ ते ४ या वेळेत घरामध्ये किंवा सावलीच्या ठिकाणी रहा.


२) बाहेर असताना छत्री/टोपी/टॉवेल वापरा. पातळ सैल सुती, हलक्या रंगाचे कपडे घाला.


३) पाणी आणि खारट पेये (लस्सी,ताक, लिंबू पाणी, फळांचे रस, ओआरएस) वारंवार प्या.


४) टरबूज, काकडी, लिंबू, संत्री इत्यादी फळे खा.


५) वारंवार थंड आंघोळ करा व खोलीचे तापमान कमी करा. खिडकीच्या शेड्स/पडदे, पंखा, कूलर, एअर कंडिशनर, क्रॉस-व्हेंटिलेट रूम, पाणी शिंपडा इत्यादी वापरा.


 जर एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल तर - 


विशेषत: वृद्ध, लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि घराबाहेर काम करणारे कामगार - त्यांना ताबडतोब सावलीच्या ठिकाणी हलवावे, कमीतकमी कपडे घालावे, थंड पाण्याने पुसून घ्या आणि जवळची आरोग्य सुविधा जेथे असेल तेथे घेऊन जा.


 हे टाळा -


१. उन्हात बाहेर जाणे, विशेषत: दुपार १२ ते ३ च्या दरम्यान टाळावे.


२. दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर कष्टाची कामे करणे टाळावे.


३. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये पिणे टाळावे.


४. उन्हाळ्यात काचा बंद वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी काही मिनीटात साठी सुद्धा ठेवून जावु नये.‌


५. गडद रंगाचे, सिंथेटिक आणि घट्ट कपडे घालु नये.


जर कोणाला उष्माघात सोम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे आढळल्यास काही होमिओपॅथिक औषधे वापरता येतात.‌ त्यामध्ये अमायलेनम नायट्रोसम, ग्लोनोइनम, बेलाडोना, कॅम्पहोरा, वेराट्रम अल्बा, इत्यादी औषधे लक्षणांनुसार होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Comments

Popular posts from this blog

......आणि गेलेले केस परत आले

रोगप्रतिकार शक्ती आणि होमिओपॅथिक औषधे