Posts

उष्णतेच्या लाटेत 'अशी' घ्या आरोग्याची काळजी...

Image
-डॉ. रणजित ढोले (एम डी होमिओपॅथी) उष्णतेची लाट केव्हा घोषित कली जाते ? जेव्हा कमाल तापमान किमान 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक होते. •उष्णतेची लाटेत सुरक्षित राहण्यासाठी कोणते उपाय करावेत ?  १) कामे करताना - दुपारी १२ ते ४ या वेळेत घरामध्ये किंवा सावलीच्या ठिकाणी रहा. २) बाहेर असताना छत्री/टोपी/टॉवेल वापरा. पातळ सैल सुती, हलक्या रंगाचे कपडे घाला. ३) पाणी आणि खारट पेये (लस्सी,ताक, लिंबू पाणी, फळांचे रस, ओआरएस) वारंवार प्या. ४) टरबूज, काकडी, लिंबू, संत्री इत्यादी फळे खा. ५) वारंवार थंड आंघोळ करा व खोलीचे तापमान कमी करा. खिडकीच्या शेड्स/पडदे, पंखा, कूलर, एअर कंडिशनर, क्रॉस-व्हेंटिलेट रूम, पाणी शिंपडा इत्यादी वापरा.  जर एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल तर -  विशेषत: वृद्ध, लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि घराबाहेर काम करणारे कामगार - त्यांना ताबडतोब सावलीच्या ठिकाणी हलवावे, कमीतकमी कपडे घालावे, थंड पाण्याने पुसून घ्या आणि जवळची आरोग्य सुविधा जेथे असेल तेथे घेऊन जा.  हे टाळा - १. उन्हात बाहेर जाणे, विशेषत: दुपार १२ ते ३ च्या दरम्यान टाळावे. २. दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर कष्टाची

रोगप्रतिकार शक्ती आणि होमिओपॅथिक औषधे

Image
 -  डॉ. रणजित ढोले (एम डी होमिओपॅथी) सध्याच्या जागतिक महामारीच्या काळात अनेकांच्या तोंडी रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी पॉवर) हा शब्दप्रयोग सुरु झाला आणि नुकतीच कोरोना महामारीची तिसरी लाट त्या विषाणूच्या ओमिक्रोन प्रकाराने डोके वर काढू लागली आहे. तेंव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती तंदरुस्त ठेवण्यासाठी होमिओपॅथिक उपचार पद्धती कशी उपयोगी आहे हे समजून घेणे महत्वाचे ठरते.  जर आपल्याजवळ तंदरुस्त रोगप्रतिकारक शक्ती असेल तर आपण कोणत्याही संसर्गजन्य आजाराविरुद्ध चांगल्याप्रकारे लढा देऊ शकतो व तसेच त्या आजाराचे दुष्परिणाम नक्कीच कमी करू शकतो. हे सर्व करण्यासाठी होमिओपॅथिक औषधे जी निसर्ग नियमावरती अवलंबून आहेत त्याचबरोबर पौष्टिक आहार, व्यायाम, व पूर्ण झोप यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.  होमिओपॅथिक औषधे ही निसर्ग नियमावरती आधारित असल्यामुळे व ती रोगप्रतिकार शक्तीवर काम करत असल्यामुळे एखादा रोग होऊ नये म्हणून आपण ती घेऊ शकतो. मागील काळात आपण पहिले की पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये होमिओपॅथिक आर्सेनिक अलबम -३० ह्या गोळीने खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि याचीच शासनाने दखल घेऊन ही औषधे प्रत्येक सरकारी दवाखान्

......आणि गेलेले केस परत आले

Image
केसगळतीवर ठरले होमिओपॅथिक उपचार प्रभावी  स्त्रीयांमधील केस गळती हा एक चिंतेचा विषय आहे. अगदी तरुण मुलींच्या मध्ये सुद्धा केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. जवळपास तिशीतली एक तरुणी केस गळतीने त्रस्त होऊन टक्कल पडलेल्या अवस्थेत उपचारांसाठी आली होती. सर्व उपाय करून थकल्यानंतर तिने शेवटचा उपाय म्हणून होमियोपॅथी उपचारांकडे आपला मोर्चा वळवल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवले.  स्त्रीयांमधील केस गळतीची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे : १. आपण घेत असलेली औषधे  २. आजारपण  ३. केसांना जंतुसंसर्ग होणे  ४. वापरले जाणारे शांपू, तेल आणि इतर रासायनिक द्रव्ये  ५. थायरॉड किंवा इतर आजार  ६. शरीरामधील रक्ताची कमतरता  ७. गर्भधारणा झाल्यानंतर  ८. स्त्रियांचे जुनाट आजार  ९. त्वचेचे आजार  १०. अति ताणतणाव  ११. एखादी शस्त्रक्रिया  यापैकी एका किंवा एकापेक्षा जास्त कारणांमुळे केस गळती चालू होऊ शकते. उपचारासाठी आलेल्या पेशंटचा शाररिक आणि मानसिक स्थितीचा संपूर्ण अभ्यास करून त्या पेशंटला होमीयोपॅथीक औषध देण्यात आले. योग्य निदान आणि पेशंटने न चुकता वेळेवर औषध घेतल्याने  ६ महिन्यांच्या कालावधीत गेलेले केस परत आले आणि पेशंट पूर्णपणे बर