Posts

Showing posts from May, 2022

उष्णतेच्या लाटेत 'अशी' घ्या आरोग्याची काळजी...

Image
-डॉ. रणजित ढोले (एम डी होमिओपॅथी) उष्णतेची लाट केव्हा घोषित कली जाते ? जेव्हा कमाल तापमान किमान 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक होते. •उष्णतेची लाटेत सुरक्षित राहण्यासाठी कोणते उपाय करावेत ?  १) कामे करताना - दुपारी १२ ते ४ या वेळेत घरामध्ये किंवा सावलीच्या ठिकाणी रहा. २) बाहेर असताना छत्री/टोपी/टॉवेल वापरा. पातळ सैल सुती, हलक्या रंगाचे कपडे घाला. ३) पाणी आणि खारट पेये (लस्सी,ताक, लिंबू पाणी, फळांचे रस, ओआरएस) वारंवार प्या. ४) टरबूज, काकडी, लिंबू, संत्री इत्यादी फळे खा. ५) वारंवार थंड आंघोळ करा व खोलीचे तापमान कमी करा. खिडकीच्या शेड्स/पडदे, पंखा, कूलर, एअर कंडिशनर, क्रॉस-व्हेंटिलेट रूम, पाणी शिंपडा इत्यादी वापरा.  जर एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल तर -  विशेषत: वृद्ध, लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि घराबाहेर काम करणारे कामगार - त्यांना ताबडतोब सावलीच्या ठिकाणी हलवावे, कमीतकमी कपडे घालावे, थंड पाण्याने पुसून घ्या आणि जवळची आरोग्य सुविधा जेथे असेल तेथे घेऊन जा.  हे टाळा - १. उन्हात बाहेर जाणे, विशेषत: दुपार १२ ते ३ च्या दरम्यान टाळावे. २. दुपारच्या वेळी बाहेर ...