Posts

Showing posts from January, 2022

रोगप्रतिकार शक्ती आणि होमिओपॅथिक औषधे

Image
 -  डॉ. रणजित ढोले (एम डी होमिओपॅथी) सध्याच्या जागतिक महामारीच्या काळात अनेकांच्या तोंडी रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी पॉवर) हा शब्दप्रयोग सुरु झाला आणि नुकतीच कोरोना महामारीची तिसरी लाट त्या विषाणूच्या ओमिक्रोन प्रकाराने डोके वर काढू लागली आहे. तेंव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती तंदरुस्त ठेवण्यासाठी होमिओपॅथिक उपचार पद्धती कशी उपयोगी आहे हे समजून घेणे महत्वाचे ठरते.  जर आपल्याजवळ तंदरुस्त रोगप्रतिकारक शक्ती असेल तर आपण कोणत्याही संसर्गजन्य आजाराविरुद्ध चांगल्याप्रकारे लढा देऊ शकतो व तसेच त्या आजाराचे दुष्परिणाम नक्कीच कमी करू शकतो. हे सर्व करण्यासाठी होमिओपॅथिक औषधे जी निसर्ग नियमावरती अवलंबून आहेत त्याचबरोबर पौष्टिक आहार, व्यायाम, व पूर्ण झोप यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.  होमिओपॅथिक औषधे ही निसर्ग नियमावरती आधारित असल्यामुळे व ती रोगप्रतिकार शक्तीवर काम करत असल्यामुळे एखादा रोग होऊ नये म्हणून आपण ती घेऊ शकतो. मागील काळात आपण पहिले की पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये होमिओपॅथिक आर्सेनिक अलबम -३० ह्या गोळीने खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि याचीच शासनाने दखल घेऊन ही औषधे प्रत...