Posts

Showing posts from December, 2021

......आणि गेलेले केस परत आले

Image
केसगळतीवर ठरले होमिओपॅथिक उपचार प्रभावी  स्त्रीयांमधील केस गळती हा एक चिंतेचा विषय आहे. अगदी तरुण मुलींच्या मध्ये सुद्धा केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. जवळपास तिशीतली एक तरुणी केस गळतीने त्रस्त होऊन टक्कल पडलेल्या अवस्थेत उपचारांसाठी आली होती. सर्व उपाय करून थकल्यानंतर तिने शेवटचा उपाय म्हणून होमियोपॅथी उपचारांकडे आपला मोर्चा वळवल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवले.  स्त्रीयांमधील केस गळतीची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे : १. आपण घेत असलेली औषधे  २. आजारपण  ३. केसांना जंतुसंसर्ग होणे  ४. वापरले जाणारे शांपू, तेल आणि इतर रासायनिक द्रव्ये  ५. थायरॉड किंवा इतर आजार  ६. शरीरामधील रक्ताची कमतरता  ७. गर्भधारणा झाल्यानंतर  ८. स्त्रियांचे जुनाट आजार  ९. त्वचेचे आजार  १०. अति ताणतणाव  ११. एखादी शस्त्रक्रिया  यापैकी एका किंवा एकापेक्षा जास्त कारणांमुळे केस गळती चालू होऊ शकते. उपचारासाठी आलेल्या पेशंटचा शाररिक आणि मानसिक स्थितीचा संपूर्ण अभ्यास करून त्या पेशंटला होमीयोपॅथीक औषध देण्यात आले. योग्य निदान आणि पेशंटने न चुकता वेळेवर औषध घ...